कोंबडी खताचे पिकाला होणारे फायदे
- By - Team Agricola
- Dec 05,2024
https://youtube.com/shorts/7gUxOxy1rMM
कोंबडी खताचे पिकाला होणारे फायदे
तुम्ही तुमच्या शेतात कोंबडी खत वापरले आहे का कमेंट करून नक्की कळवा. कोंबडीची विष्टा तसेच लाकडाचा भुसा आणि साळीचा भुसा, शेंगाची टरफले एवढे सर्व घटक कुजल्यानंतर जो घटक तयार झालेला असतो त्यास कोंबडी खत असे म्हणतात. पण या खताचे फायदेही तितकेच महत्वाचे आहेत जसे की कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते. त्यानंतर सेंद्रिय खताचा वापर वाढवल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यांपर्यंत बचत होते. कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो. ऊस, फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास चांगली मदत देखील होते बाकी तुम्ही तुमच्या शेतीत या खताचा वापर केला आहे का? नक्की कळवा.