कोंबडी खत वापरण्याची पद्धत
- By - Team Agricola
- Dec 06,2024
कोंबडी खत वापरण्याची पद्धत
https://youtube.com/shorts/blfbrm3GsWs
कोंबडी खत आणि त्याचे फायदे हे तर तुम्ही गेल्या व्हिडीओत पाहिलेच आहे. पण कोंबडी खत वापरण्याची पद्धत काय आहे ती आता या व्हिडीओतून पाहूयात. मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीडमहिना अगोदर कोंबडी खत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी. ताजे कोंबडी खत उभ्या पिकात, जमिनीत मिसळून नये. जर उद्या पिकात द्यायचे असेल तर एक महिना अगोदर पाणी शिंपडून ते थंड होऊ द्यावे.म्हणजे त्याचे कर्ब नत्र गुणोत्तर स्थिर राहते. त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. पिकात खते देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.ओलावा नसेल तर पीक पिवळे पडण्याची शक्यता असते. ताजी कोंबडी खत लगेच पिकांना वापरू नये. जमीन व पीक लागवडी नुसार प्रति एकरी पाच ते 20 टन खताचा वापर करावा.