new-img

हरितगृह, शेडनेटमध्ये पीक घ्यायचे आहे, तर करा पिक व्यवस्थापन

हरितगृह, शेडनेटमध्ये पीक घ्यायचे आहे, तर करा पिक व्यवस्थापन

https://youtube.com/shorts/1FRVXUsYGY0

हरित गृह,शेडनेटमध्ये जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक घ्यायचे असेल तर व्यवस्थापन कसे करावे याची माहिती असणे गरजेचे आहे. हरितगृहाचे पडदे दिवसभर उघडे ठेवावेत. पाण्याचे व्यवस्थापन करताना सायंकाळी आणि सकाळी वाफसा स्थिती राहील अशा पद्धतीने वाढत्या तापमानात व्यवस्थापन करावे. गादी वाफ्याच्याकडा सकाळी ओल्या करून घ्यावेत. शक्य असल्यास दोन्ही गादी वाफ्यामधील भागांमध्ये पाणी भरून ठेवावे. शेडनेट मधील तापमान 32 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि रात्रीच्या वेळी 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे. शेडनेट मधील जुने प्लॉट संपले असतील तर या ठिकाणी नेट उघडी ठेवून नांगरणी करून घ्यावी. व माती तापवावे म्हणजे नैसर्गिक रित्या मातीचे निर्जंतुकीकरण होते. वादळी वारे किंवा जास्त पाऊस यामुळे शेडनेटचे नुकसान होते त्यामुळे शेडनेटचा विमा उतरवणे आवश्यक आहे.