सोयाबीन आणि कापूस: सरकारच्या योजना अपयशी?
- By - Team Agricola
- Dec 09,2024
सोयाबीन आणि कापूस: सरकारच्या योजना अपयशी?
गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन आणि कापसाच्या भावाने शेतकऱ्याना रडकुंडीला आणून सोडलय. सोयाबीन कापूस भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन ही पिके घरात साठवून ठेवली आहे. तर काही शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपायी सोयाबीन बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने विकली आहे. शेतकऱ्यांचा कापसाला देखील अपेक्षित असा दर मिळताना दिसून येत नाहीये. त्यामुळं मिळालेल्या दारातून उत्पादन खर्च तरी भरून निघेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहुयात सोयाबीन आणि कापूस पिकासंदर्भात विश्लेषण.