कांद्यावरील मर रोगाकडे दुर्लक्ष करताय?
- By - Team Agricola
- Dec 10,2024
कांद्यावरील मर रोगाकडे दुर्लक्ष करताय?
https://youtube.com/shorts/u2BUE5Hi4r8
शेतकऱ्यांनो शेतात कांदा लावण्याचा विचार करताय का? तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीची लगबग सुरूय. शिवाय गेल्या काही दिवसांपासून थंडही वाढली आहे. त्यामुळे कांदा पिकावर या वातावरण बदलाचा परिणाम हा होत असतो. धुक्याच्या प्रभावामुळे कांदा रोपाची पात ही जळून जाते आणि गळून पडते. अशावेळी कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव हा पडत असतो. रब्बी हंगामात दरम्यान पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरण असल्यास व रोपवाटिकेत बुरशीमुळे मर रोग होतो. रोप वाढत असतानाही बुरशी जमिनीलगतचा भागातून शिरकाव करते. यामध्ये जमिनीलगतचा रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे गळून जातात, सुकतात व पिवळी पडतात. त्यावर पांढरी बुरशी वाढते. बुरशी जमिनीत सुप्तावस्थेत अनेक वर्षे राहू शकते. या रोगामुळे रोपांचे न भरुन निघणारे नुकसान होते. शिवाय याकडे दुर्लक्ष केले तर याचा प्रादुर्भावही इतर रोपांवरही होतो.