सोयाबीनला भाव मिळेना, उत्पादक शेतकरी अडचणीत
- By - Team Agricola
- Dec 10,2024
सोयाबीनला भाव मिळेना, उत्पादक शेतकरी अडचणीत
सोयाबीनला बाजारसमितीत गेल्या दोन वर्षापासून कमी दर मिळतोय. हमीभावापेक्षाही सोयाबीनचे भाव घसरले आहेत त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारसमितीत सोयाबीनला १० डिसेंबर रोजी सरासरी ४२५० रूपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.
बाजारातील सोयाबीनचे आजचे दर
वाशिम- ४१०० रू
हिंगणघाट- ३५०० रू
अकोला- ४१५० रू
कारंजा- ३९५० रू
अमरावती- ३८१४ रू
लातूर- ४१२० रू