new-img

काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

२०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी अनुदान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.
या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.