new-img

असे करा, फळमाशीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

असे करा, फळमाशीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन 

https://youtube.com/shorts/jgjriJhtMb4

तुम्ही फळबाग लावला आहे तर तुम्हालाही फळमाशीचा सामाना करावा लागू शकतो. यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन हे फार गरजेचे आहे. यासाठी नंबर १ जमिनीची नांगरट करून जमीन चांगली तापू देणे गरजेचे असून त्यामुळे या अळीचे कोश उष्णतेत नष्ट होतात. नंबर २ मशागत करताना जमिनीमध्ये शिफारस केल्यानुसार कीडनाशक मीसळणे गरजेचे आहे. नंबर ३ शक्यतो फळमाशीला प्रतिकारक असणाऱ्या जातींची लागवड करणे गरजेचे आहे. नंबर ४ फळमाशी ग्रस्त बागेत पडलेली फळे गोळा करून ती नष्ट करून टाकावी किंवा लांब नेऊन त्यांचा नायनाट करावा. नंबर ५ बागेमध्ये मिथिल युजेनॉलचे सापळे एका हेक्‍टरसाठी पाच किंवा दहा लावावे व त्यामधील कीटकनाशक १५ ते २० दिवसांनी बदलणे गरजेचे आहे. नंबर ६ तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांची फवारणी घेणे गरजेचे आहे.