new-img

सोयाबिन भावातील घसरण कायम, उत्पादक शेतकरी संकटात

सोयाबिन भावातील घसरण कायम, उत्पादक शेतकरी संकटात.

सध्या बाजारात विविध पिकांच्या भावात चढ- उतार सुरू आहे. सोयाबीनच्या भावावर दबाव निर्माण झाला आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी कमी दरात सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार १४ डिसेंबर रोजी राज्यातील बाजारसमितित सोयाबीनला हमीभावपेक्षा कमी दर मिळाला आहे. अमरावती बाजारसमितीत ४०२५ रुपये बाजारभाव मिळाला आहे. हिंगोली बाजरसमितीत ३९७५ रुपये भाव मिळाला आहे. अकोला बजारसमीतीत ४००० रुपये भाव मिळाला आहे.
बाजारात सोयाबीनला आम्ही भावापेक्षा कमी दर मिळाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.