सेंद्रिय शेतीच्या योग्य पद्धती
- By - Team Bantosh
- Dec 17,2024
सेंद्रिय शेतीच्या योग्य पद्धती
https://youtube.com/shorts/yY1slHGPItc
सेंद्रिय शेती करण्याचा विचार करताय का? तर या शेतीपद्धतीत महागड्या व घातक रासायनिक खतांचा वापर टाळून नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते. तर या व्हिडीओत पाहणार आहोत सेंद्रिय शेतीच्या पद्धती. नंबर १. सिंचनाच्या सुविधा वाढवून पाण्याचे प्रदूषण टाळावे. नंबर २ पीक पद्धतीमध्ये पिकांची फेरपालट करून द्विदल पिकांचा समावेश करावा. नंबर ३ मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. नंबर ४ पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा साठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते, गांडूळ खते, अखाद्य पेंड, मासळीची खते, जनावरांची उत्पादने आणि जिवाणूसंवर्धक यांचा वापर करावा. नंबर ५ सतत ओलावा व सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होत असणाऱ्या नारळी, पोफळी व मसाला पिकांच्या बागांमध्ये गांडूळ शेतीचा अवलंब करावा. नंबर ६ अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी ताग, धैचा, गवार, मुग, चवळी,उडीद, शेवरी, गिरीपुष्प, सुबाभूळ यासारख्या हिरवळीच्या खतांचा वापर करावा.