जानेवारी ते मार्च दरम्यान करा खरबुजाची लागवड
- By - Team Agricola
- Dec 19,2024
जानेवारी ते मार्च दरम्यान करा खरबुजाची लागवड
https://youtube.com/shorts/eYN6wMULtNQ
१०० दिवसात फळशेतीतून दुप्पट नफा हवा आहे का? तर पुर्ण व्हिडीओ नक्की पहा. उन्हाळ्यात खरबुजाला मोठ्यान प्रमाणात मागणी असते. खरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च या दरम्यान केली जाते. लागवड गादीवाफ्यावर करून ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ८० ते १०० दिवसांत पीक काढणीस तयार होते. दुष्काळी भागात येणारे पीक म्हणून खरबूज पीक ओळखले जाते. जमीन व हवामान रेताड, मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. चोपण व पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. भारी जमिनीत पिकांना नियमित पाणी दिले नाही, तर फळे तडकतात. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. या पिकाला कोरडे आणि उष्ण हवामान लागते त्यामुळे याची लागवड उन्हाळ्यात करतात.