new-img

सोयाबीनला ६००० रूपये हमीभाव देणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोयाबीनला ६००० रूपये हमीभाव देणार -  पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या काही काळापासून राज्यात शेतीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळेच कर्जमाफी, हमीभाव, वीजबील माफी अशी अश्वासनं काही पक्षांनी दिली आहेत. राज्यात सोयाबीनला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात ‘सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुतीचे सरकारने पाच हजार रुपयांची स्वतंत्र मदत दिली. आता सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल’, अशी घोषणा केली. 
वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. एकट्या पश्चिम विदर्भात 71 अब्ज रुपयांहून अधिकचे सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या शेतकऱ्यांना आधार म्हणून महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार, असे आश्वासन दिले.