new-img

महाराष्ट्रातील गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू

महाराष्ट्रातील गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू

राज्यातील गाळप हंगामाला अखेर सुरूवात झाली  आहे. 15 नोव्हेंबर पासून गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाळप हंगाम दहा दिवस उशिराने सुरू करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या स्तरावर सुरू होता. पण मंत्री समितीने ठरवलेल्या तारखेला अर्थात १५ नोव्हेंबर रोजी गाळपायला सुरुवात झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. परंतु ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक स्थलांतर करत असतात यामुळे या कामगारांना मतदान करता येणार नाही. म्हणून गाळप हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याची हालचाली सुरू होत्या पण तरी देखील हा हंगाम सुरू झाला आहे.

साखर आयुक्तालयाने आजपर्यंत ५१ सहकारी आणि ५१ खाजगी साखर कारखान्यांना गाळपची परवानगी दिती आहे. पण निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या निर्णयाचे पालन साखर कारखान्यांना करावे लागत असल्याची सत्ता ताकीदही कारखान्यांना दिलेल्या परवानावर दिलेली आहेत उर्वरित साखर कारखान्यांना परवानगी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून मिळालेली आहे