new-img

सूर्यफुलाच्या शेतीतून कमवा लाखो रुपये... खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सुर्यफुलाच्या शेतीतून तुम्ही कमवा लाखो रूपये

https://youtube.com/shorts/HZAz4AMDY_Y

एक असे पीक आहे जे वर्षभर आपण आपल्या शेतात घेऊ शकतो आणि त्यातून चांगला नफा देखील मिळू शकतो. ते तुम्हाला माहिती आहे का?  तर ते पीक आहे सूर्यफुलाचे. सूर्यफुलाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. सूर्यफुलाच्या लागवडीसाठी हेक्टरी पाच ते सहा किलोग्राम संकरित आणि सात ते आठ किलोग्राम सामान्य प्रजातींचे बियाणे आवश्यक असते. सूर्यफुलाच्या लागवडी दरम्यान सिंचनाला खूप महत्त्व आहे. अशा स्थितीत पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिले पाणी द्यावे. त्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तसेच फुल आणि दाणे तयार होण्याच्या वेळी शेतात ओलावा नसताना चार ते पाच वेळा पाणी देणे आवश्यक आहे. सूर्यफुलाची लागवड केल्यास हेक्टरी 22 ते 28 क्विंटल बियाणे उत्पादन घेता येते. त्यामुळे शेतकरी यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात. बाकी तुम्ही कधी सुर्यफुलाची शेती केली का कमेंट करून नक्की कळवा.