अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक
- By - Team Agricola
- Nov 27,2024
अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक
सोयाबीन बाजारातील आवक
नागपूर- ४४९ क्विंटल
अमरावती- ७३७७ क्विंटल
हिंगोली- १०८० क्विंटल
बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या सोयापबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची आवक ही ७३७७ क्विंंटल झाली असुन या बाजारसमितीत सोयाबीनला दर हा ४११० रूपये मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी भाव हा ४११० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ४००० ते जास्तीतजास्त दर हा ४२२१ रूपये मिळाला असुन ७३७७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी भाव हा ४२४७ रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत १०८० क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी भाव हा ४०४० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत ४४९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असुन कमीतकमी दर हा ३६०० जास्तीतजास्त दर हा ४१८६ रूपये मिळाला आहे.