फळबागेसाठी जमिनीची निवड अशी करा.
- By - Team Bantosh
- Nov 29,2024
फळबागेसाठी जमिनीची निवड अशी करा
https://youtube.com/shorts/9RshmR5R6xg?si=Kjlz6DJWsRTczpod
फळबाग लागवडीचा विचार आहे पण त्यासाठी कोणती जमिन योग्य असावी असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का?
आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, हलकी, मध्यम कि भारी हे सर्वाना परिचित असतेच.जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी.जमिनीची खोली किती आहे? जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे? जमिनीचा निचरा कसा आहे? त्याचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी.फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी १ मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमिन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत,मध्यम पोताची जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा.मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी असावे. जमिनीचा उतार २ ते ३ टक्क्यापेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे,त्या ठिकाणच्या मातीचे परिक्षण करून घेणे आवश्यक आहे.