new-img

नंदूरबार बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी ३९५५ रूपये भाव

नंदूरबार बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी ३९५५ रूपये भाव

सोयाबीनला बाजारात समितीत हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. सोयाबीन कमी दर मिळाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार २९ नोव्हेंबर २०२४ रोजी नंदुरबार बाजारसमितीत सोयाबीनला ३९७५ रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ३७५० रूपये मिळाला असुन जास्तीतजास्त भाव हा ४२३५ रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत २३७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. नांदेड बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर हा ४२०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत सोयाबीनची आवक २३२ क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ३८४५ रूपये भाव मिळाला असुन जास्तीतजास्त दर हा ४२७० रूपये भाव हा मिळाला आहे. बाजारसमितीत सोयाबीनची आवक कमी झाली आहे तरीदेखील सोयाबीनला बाजारात कमी भाव मिळत आहे.