कांद्याला बाजारसमितीत किती मिळतोय बाजारभाव ?
- By - Team Agricola
- Nov 30,2024
कांद्याला बाजारसमितीत किती मिळतोय बाजारभाव ?
कांद्याला बाजारसमितीत सरासरी समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. कांद्याला बाजारात उन्हाळी सरासरी दर हा ६००० रूपयांपर्यंत मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारसमितीत ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सरासरी ६००० रूपये भाव मिळाला होता. या दिवशी पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला सरासरी दर हा ६००० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा २५०१ रूपये भाव मिळाला असुन जास्तीतजास्त दर हा ६७५२ रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत २०० क्विंटल आवक झाली आहे. छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत सरासरी २९५० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा १२०० ते जास्तीतजास्त दर हा ४७०० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत ७९० क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला सरासरी ३८०० रूपये भाव मिळाला आहे. पुणे- मोशी बाजारसमितीत कांद्याला सरासरी भाव हा ४००० रूपये मिळाला आहे.
पुणे-मोशी- ४००० रूपये भाव
पिंपळगाव बसवंत- ६००० रूपये भाव
छत्रपती संभाजीनगर- २९५० रूपये भाव