new-img

दुधाळ जनावरांसाठी हा आहार ठरणार फायदेशीर

दुधाळ जनावरांसाठी हा आहार ठरणार फायदेशीर

https://youtube.com/shorts/nU90bvSDuf8?si=UyT-5RK245sp8ECq

दुधाळ जनावरांसाठी आहार हा फार महत्वाचा असतो. त्यामुळे पशुपालकांनी त्यांच्या आहाराकडे वेळीच लक्ष द्यावे. 

नंबर १. सुक्‍या चाऱ्यामध्ये गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा, भाताचा पेंडा, मिश्र सुका चारा जनावरांच्या आहारात द्यावा. 

नंबर २ पशुखाद्यात दोन टक्के खनिज मिश्रण, एक टक्का चुना पावडर आणि एक टक्का मिठाचा समावेश करावा. 

नंबर ३ दुधाळ गाईस एक ते 1.5 किलो पशुखाद्य शरीर पोषणासाठी आणि एक किलो अंबोण प्रति 2.5 किलो दुग्धोत्पादनासाठी द्यावे. 

नंबर ४ दुधाळ म्हशींना प्रति किलो दुग्धोत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गाईंना लागणाऱ्या अन्नघटकांपेक्षा अधिक असतात. याचे कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा जास्त असते. 

नंबर ५ समतोल आहारामध्ये ओली वैरण, कोरडी वैरण आणि अंबोण यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे. जनावरांना हिरवी वैरण देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे.