new-img

टोमॅटोला बाजारसमितीत किती मिळतोय बाजारभाव

टोमॅटोला बाजारसमितीत किती मिळतोय बाजारभाव

टोमॅटो आजचे दर ०२-१२-२४

सध्या बाजारात सरासरी टोमॅटोला भाव हा २ हजार रूपये ते ३३०० रूपयांच्या दरम्यान मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यात टोमॅटोला सरासरी पुणे कृषी उत्पन्न बाजासमितीत २ हजाार रूपये भाव मिळाला असुन या बाजारसमितीत कमीतकमी दर १ हजार रूपये जास्तीतजास्त दर ३००० रूपये ते सरासरी दर हा २००० रूपये मिळाला आहे. या बाजारात १५४० क्विंटल टोमॅटोची आवक झालेली आहे. अकलुज कृषी उत्पन्न बाजारसमितीत टोमॅटोला सरासरी भाव हा ३ हजार रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत १९ क्विंटल टोमॅटोची आवक झालेली असुन कमीतकमी दर १००० ते जास्तीत भाव ३४०० रूपयांपर्यंत मिळाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत नं १ टोमॅटोला सरासरी भाव ३३०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत कमीतकमी दर २८०० ते जास्तीतजास्त भाव ३८०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत ९८४ क्विंटल टोमॅटोची आवक झालेली आहे. रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजारसमितीत टोमॅटोला सरासरी भाव ३३०० रूपये भाव मिळाला असुन या बाजारसमितीत १८ क्विंटल टोमॅटोची आवक झालेली आहे्. कमीतकमी दर ३ हजार ते जास्तीतजास्त दर ३५०० रूपये मिळाला आहे.