फळबागेत फूल अंतरपीक घेण्याचे फायदे
- By - Team Agricola
- Dec 03,2024
फळबागेत फूल आंतरपीक घेण्याचे फायदे
https://youtube.com/shorts/Xts-Tm2wQuA
फळबागेत फुल आंतरपीक म्हणून घेतले नसेल तर नक्की घेऊन बघा त्याचे फायदेही तसेच आहेत. फुल पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करायची असेल तर महत्त्वाचा फायदा म्हणजे याची आवश्यकता आणि मागणीनुसार मुख्य पिकांमध्ये लागवड करता येते व या फळपिकांचा सापळा पीक म्हणून देखील चांगला उपयोग करता येतो.तसेच फळ बागांमधील दोन झाडांच्या मध्ये जिथे मोकळी जागा असते त्याचा फूल पिकांच्या लागवडीसाठी उत्तम पद्धतीने वापर शक्य होतो.त्यामुळे कमी कालावधीत पिकांपासून चांगले उत्पादन मिळते. तसेच आपण जेव्हा दोन फळपिकांच्या झाडांमध्ये असलेल्या मोकळ्या जमिनीत जेव्हा फुल पिकांची लागवड करतो तेव्हा तणाचा प्रादुर्भाव होत नाही व त्यामुळे तणनियंत्रणासाठी चा खर्च कमी होतो. आणि दुप्पट नफा देखील मिळतो.